खुशखबर ! गुरुवारपासून कणकवलीत नियमित पाणीपुरवठा

आमदार नितेश राणेंनी पाणीटंचाईची घेतली दखल

मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची माहिती

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात मागील 4 दिवस तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.याची दखल आमदार नितेश राणेंनी घेत प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीही याचा पाठपुरावा प्रशासनाकडे केला होता. त्यानुसार उद्या गुरुवारपासून कणकवली वासीयांना नियमित पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.

error: Content is protected !!