राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी): वैचारिक शुन्यता असलेले आणि प्रसिद्धीसाठी हपापलेले व आपल्या नेत्याची मर्जी संपादन करण्यासाठी दादा साईल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा देताना निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत नको अन्यथा गप्प बसणार नाही असे बालीश उद्गार काढण्याअगोदर याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २२ नोव्हेंबर २००३ रोजी कणकवलीत राणे परिवाराची काय हालत केली होती,त्यावेळी आपण कदाचित बाल्यावस्थेत होता,त्यामुळे यांची माहिती दादा साईल यांनी आपल्या नेत्याकडून घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस काय चीज आहे हे समजेल,ती माहिती प्रथम घ्यावी,नंतरच राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा द्यावा,यापुढे दादा साईलच्या पोकळ धमकीना राष्ट्रवादी काँग्रेस भीक घालणार नाही,तर जशास तसे त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाच्या दावणीला बांधलेला नाही किंवा कुणाच्या ताटाखालचे मांजर नाही,परिस्थिती नुसार सत्तेची चव चाखण्याची सवय असलेल्या दादा साईल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा देण्याच्या भानगडीत पडू नये,आपली अवकात काय हे ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसवर वक्तव्य करावीत,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उगाच कुणाच्या अंगावर जात नाहीत,पण दादा साईल सारखे चिल्लर कोण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंगावर येण्याची हिम्मत करत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस काय आहे हे दाखवून दिले जाईल,यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सोडाच सामान्य कार्यकर्त्यांवर बोलण्याअगोदर आपले आश्रय दाते सन्माननीय नाम,नारायण राणे साहेब यांच्या कडून माहिती घ्यावी त्यानंतरच प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करावा,एकवेळ आपल्याच नेत्यांनी सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही शिल्लक ठेवणार नाही अशी मुक्ताफळे उधळली होती,पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत असून येत्या १०जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रौप्यमहोत्सवी वर्षात दिमाखदारपणे पदार्पण करत आहे,याचेही आत्मचिंतन दादा साईल यांनी करावे,आपल्या नेत्यांनी आपला “स्वाभिमान” पक्ष आणि तत्व गुंडाळून आतापर्यंत सत्तेच्या लालसेपोटी किती पक्षाचा आधार घ्यावा लागला याचेही आत्मपरीक्षण दादा साईल यांनी करावे,त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान द्यावे,असे सांगताना अनंत पिळणकर म्हणाले
माजी खासदार निलेश राणे यांना जसे खासदार बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार त्यावेळी घेतला होता, तसाच त्यांना माजी खासदारही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच बनवण्यासाठी पुढाकार घेतला होता,यांचीही माहिती आपल्या नेत्यांकडून घेतल्यास राष्ट्रवादीच्या संघटने बाबत आपल्या ज्ञानात भर पडेल,पक्ष संघटनेत आपले वजन वाढावे नेते खुष व्हावेत यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस वर निशाण साधण्याचा केविलवाणा प्रयत्न दादा साईल यांनी करू नये,यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला जाल तर राष्ट्रवादी काँग्रेस ही काय चीज आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दाखवून देतील,असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला आहे.