झाराप पत्रादेवी महामार्गावर अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्या संदर्भात निवेदन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी नेमळे, मळगाव, वेत्ये ग्रामस्थांनी नेमळे फौजदारवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले होते. या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम निभागाचे कार्यकारी अभियंता जाधव, कांबळे यांच्याशी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, सरपंच,उपसरपंच तसेच नेमळे ग्रामस्थांनी नेमळे ग्रामपंचायतीमध्ये चर्चा करुन अधिकार्‍ यांना निवेदन देण्यात आले.

यात राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड बॉक्सेल करुन द्यावा जेणेकरून ग्रामस्थाना महामार्गावर जाण्याची वेळच येणार नाही. ग्रामपंचायात कार्यालय नेमळे, मळगाव, वेत्ये सर्कलवर सिग्नल सि. सि. टिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, महामार्गावर स्ट्रीट लाईट नेमळे गांवकर कुंभारवाडी येथे बॉक्सेल तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड करून द्यावा. या अशा इतर मागण्या सरपंच दिपिका भैरे यांनी लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता जाधव यांना दिले.

यावेळी जाधव यांनी तुमच्या महामार्गा संबंधीच्या मागण्या उपाययोजना व रिष्ठाकडे पाठवून देऊन याची लवकरात लवकर पूर्तता केली जाईल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, सरंपंच दिपिका भैरे उपसरपंच सखाराम राऊळ, ग्रा. सदस्य स्नेहाली राऊळ , शितल नाणोसकर, एकनाथ राऊळ, सिद्धेश नेमळेकर, आरती राऊळ, सुहास पिकूळकर, सागर नेमळेकर, गौरवी कुणकेरकर, शुभांगी रेडकर, संज्योता नेमळेकर शाखा प्रमुख सचिन मुळीक उप शाखा प्रमुख अजय राऊळ सुनिल, बाळकृष्ण राऊळ, दिलीप भैरे ,एकनाथ चव्हाण , रुपाली चव्हाण, दाजी राऊळ महेंद्र परब, सोनसुरक२ , मिलींद नेमळेकर , सुरेश राऊळ ,महेश हवालदार, सागर , तसेच इतर ग्रामस्थ . मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!