खासदार विनायक राऊत यांचा पेंडूर मतदारसंघात झंजावाती गावभेट दौरा

आमदार वैभव नाईक , संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांचीही उपस्थिती

आंबेरी धामापूर काळसे पेंडूर येथील कार्यकर्त्यांशी साधला संवाद

चौके ( अमोल गोसावी ) : रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख श्री. अरुण दुधवडकर व आमदार श्री. वैभव नाईक यांनी आज पेंडूर मतदारसंघात झंजावाती दौरा करत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन विकासकामांसंबंधी समस्या जाणून घेतल्या आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान काळसे येथील माऊली मंदिरात गावातील कार्यकर्त्यांची खासदार विनायक राऊत यांनी भेट घेत संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर प्रभु यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देउन खासदार विनायक राऊत यांचे स्वागत करण्यात आले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते , तालुकाप्रमुख हरी खोबरेकर , महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत , महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, तळगाव सरपंच लता खोत, पेंडूर विभागप्रमुख कमलाकर गावडे , शाखाप्रमुख राजू परब , अण्णा गुराम, विनायक प्रभु , ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत राऊळ , भाग्यश्री काळसेकर , मनीषा घाडी , नंदू प्रभु , उमेश प्रभु , प्रकाश प्रभु , प्रशांत खोत , अजित खोत, प्रशांत प्रभु शंकर परब , संतोष वालावलकर , अशोक परब , सुधीर परब , आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!