कुळकर्णी कुटुंबीयांकडून शेठ म ग देवगड हायस्कूलला पंप सेटची देणगी

देवगड (प्रतिनिधी) : देवगड कुळकर्णी मेडिकल स्टोअर्स चे संचालक श्रीपाद उर्फ किशोर कुळकर्णी यांच्या कुटुंबीयांकडून शेठ म ग हायस्कूल देवगडला आवश्यक असणाऱ्या पाण्याचा पंप सेट देणगी स्वरूपात नुकताच त्यांनी संस्थेकडे सुपूर्द केला. हा पंप सेट त्यांचे वडील बाबा कुळकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात आला.

याप्रसंगी स्थानीय समितीचे अध्यक्ष डॉक्टर के .एन बोरफळकर, सचिव अॅड .अ म माणगावकर, उपाध्यक्षा अ रा नेने, पदाधिकारी चं स शिंगाडे डॉ पु प्र आपटे ,तसेच शिल्पा कुळकर्णी, अभय कुळकर्णी किशोर कुळकणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

त्यांच्या या देणगी बद्दल देवगड एज्युकेशन बोर्डाने त्यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!