एसटी चालक सिद्धार्थ तांबे यांचा उत्कृष्ट चालक पुरस्काराने सन्मान

कणकवली (स्वप्नील तांबे) : २५ वर्षांहून अधिक काळ एस.टी. महामंडळामध्ये अपघात विरहित सेवा बजावलेल्या चालक सिद्धार्थ गंगाराम तांबे यांना महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सिद्धार्थ तांबे यांनी २५ वर्षांहून अधिक काळ एसटी महामंडळामध्ये प्रामाणिक आणि अपघात विरहित सेवा बजावली आहे. त्यामुळे रा. प. महामंडळाची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासोबतच प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

error: Content is protected !!