जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा पूर्व तयारीसह नवागतांचे स्वागत

शालेय पाठयपुस्तकासह गणेशाचे वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे आज शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने आरती ओवाळून कुकुंम तीलक लावत तसेच गुलाबपुष्प व गोड पदार्थ देऊन धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. तर यानिमित्ताने शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राप्ती कट्टी,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका गुरव,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मनोज करंदीकर, ऋषिकेश जाधव,मंगेश ब्रम्हदंडे, समृध्दी लोकरे, संध्या पोरे,दीक्षा पाटणकर, करांडे,पूजा कासलीवाल,दिनेश कानडे,सुरेंद्र धामापूरकर,गुणाजी कानडे आदी मान्यवर ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून प्रास्तविक केले. शाळेत नव्याने दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या शिक्षिका व समिती सदस्यांच्या वतीने पुषपगुच्छ देऊन शाळेत आनंदी व उस्ताही वातावरणात स्वागत करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्याना नवीन पाठ्यपुस्तके,वह्या व शालेय गणवेश आदी साहित्याचे उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. तसेच शाळा पूर्व तयारी च्या दृष्टीने लावण्यात आलेल्या एकूण ६ स्टॉलवर विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांना त्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आले. “हसत – खेळत शिक्षण देणे.हा त्यामागचा उद्देश होता.या शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घघाटन शाळा समिती अध्यक्षा प्राप्ती कट्टी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. “खारेपाटण केंद्र शाळा ही राज्यातील टॉप मॉडेल स्कूल म्हणून ओळखली जाणारी प्राथमिक शाळा असून दर्जेदार शिक्षण व विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासा बरोबरच मराठी शाळांची दिवसेंदिवस घटत चाललेली पटसंख्या वाढवून संस्कारक्षम शिक्षणावर भर देणारी ही शाळा आहे.असे प्रतिपादन शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.” यावेळी प्राप्ती कट्टी, सुरेंद्र धामापूरकर, प्रियंका गुरव यांनी विद्यार्थ्याना नवीन शैक्षणिक वर्षासाठी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका रुपाली पारकर,अलका मोरे,आरती जेजोन, काझी मेडम, ब्रम्हदंडे यांनी परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका रेखा लांघी यांनी केले.तर सर्वांचे आभार मुख्याध्यापक श्रावणकर सर यांनी मानले.

error: Content is protected !!