उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांचा इशारा
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील 38 शाळां शून्य शिक्षकी शाळा असून विदयार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होणार आहे .या सर्व शाळा बंद न करता या शाळांवर शिक्षकांची नियुक्ती तात्काळ करण्यात व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. या वर येत्या २२ जून पर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास पालकांसमवेत देवगड पंचायत समिती शिक्षण विभागासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कणकवली विधानसभा शिवसेना नेते सतीश सावंत यांनी देवगड येथे पंचायत समिती शिक्षण विभागाशी चर्चा करताना दिला. देवगड तालुक्यातील शून्य शिक्षकी शाळा बंद करण्यात न येता त्याठिकाणी कायमस्वरूपी शिक्षक व्यवस्था करण्यात यावी या मागणीसाठी देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने देवगड पंचायत समिती शिक्षण विभागाचे समोर धडक मारून जाब विचारण्यात आला.
देवगड तालुक्यात एकूण ४५३ शिक्षकांपैकी २६९ शिक्षक असून १७४ शिक्षक कमी आहेत.तालुक्यात एकूण ४००० हजार विद्यार्थी आहेत. रिक्त जागांवर डीएड,बीएड झालेले ५०० शिक्षक मानधन तत्वावर नेमाने व विद्यारर्थ्यांना शिक्षण द्यावे. अशी मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.शून्य शिक्षकी शाळा बंद करणे हे शासनाचे चुकीचे धोरण आहे. आपल्याच जिल्ह्याचे शिक्षण मंत्री असताना देखील शून्य शिक्षकी शाळा म्हणून आपल्या जिल्हयाला फटका बसला हे दुदैव आहे. जिल्ह्यात शून्य शिक्षकी १२१ शाळा व देवगड तालुक्यात सर्वाधिक 38 शाळा आणि जिल्ह्यात ११४० शिक्षकांची कमतरता हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ओढवलेले शासन पुरस्कृत संकट आहे.यामध्ये देवगड तालुक्यातील शाळांचा देखील समावेश असल्यामुळे १५ जून पुस्तके व शालेय गणवेश वाटपकरिता तात्पुरती व्यवस्था करण्यात आली .असून ती व्यवस्था कायम स्वरूपी करण्यात यावी असेही सांगण्यात आले.
१५ जून रोजी शिवसेना युवासेना शिवसैनिकांसह देवगड पंचायत समिती शिक्षण विभागाला धडक देण्यात येऊन जाब विचारण्यात आला.यावेळी देवगड पंचायत समिती शिक्षण विभाग प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे याना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,१२१ शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विदयार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होणार आहे. आपल्याच जिल्ह्याचे शिक्षण मंत्री असताना देखील शून्य शिक्षकी शाळा म्हणून आपल्या जिल्हयाला ठपका बसला हे दुदैव आहे.
याप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सतीश सावंत, माजी सभापती रवींद्र जोगल,माजी उपसभापती अमित साळगावकर,तालुका प्रमुख मिलिंद साटम,जयेश नर,ॲड. प्रसाद करंदीकर,महिला आघाडी वर्षा पवार, नगराध्यक्षा साक्षी प्रभू,स्वप्नाली वाल्मिकी, युवासेन तालुका प्रमुख गणेश गांवकर, नगरसेवक विशाल मांजरेकर,नितीन बांदेकर,सुनील जाधव,सुनील तिर्लोटकर, उदय करंगुटकर,महेंद्र भुजबळ,गणपत जाधव , विभाग प्रमुख रमाकांत राणे,संदीप डोळकर, गणेश वाळके,राजू वाळके, शाखाप्रमुख बाळा कणेरकर, इम्रान साटविलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.













