वेताळ बांबर्डे देऊळवाडी प्रशालेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात

कुडाळ ( अमोल गोसावी ) : शाळा वेताळ बांबर्डे देऊळवाडी प्रशालेत आज, गुरुवारी शाळापूर्व तयारी मेळावा, शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम आणि पाठ्यपुस्तक वितरण हे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमास वेताळ बांबर्डे गावच्या सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, स्थानिक प्राधिकरण सदस्या रश्मी तिवरेकर, ग्रा. पंचायत सदस्य शैलेश घाटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विद्या बांबर्डेकर, शाळा समिती सदस्य, माता पालक सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, पालकवर्ग, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शिक्षिका अनुजा चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिक्षिका वैभवी तेली यांनी केले.

error: Content is protected !!