साखरपा येथील मोटरसायकल अपघातात बांद्यातील युवक ठार ; पत्नी गंभीर जखमी

बांदा (प्रतिनिधी): रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर साखरपा येथे दुचाकीचा अपघात होऊन बांदा-शेटकरवाडी येथील युवक गणेश शेटकर (वय ३२) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पाठीमागे बसलेली त्याची पत्नी सुमित्रा गणेश शेटकर ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात आज सकाळी झाला. याबाबतची माहिती साखरपा पोलीस कर्मचारी तानाजी पाटील यांनी दिली.

error: Content is protected !!