शिवसेना वर्धापन दीन निमित्त खारेपाटण येथे वृक्षारोपण..

खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या १९ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या ५७ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभमीवर खारेपाटण शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने नुकतेच प्रा.आ.केंद्र खारेपाटण येथे सरपंच सौ.प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर,युवा सेना जिल्हा प्रमुख व युवा उद्योजक सुकांत वरुणकर, शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख श्री मंगेश गुरव,खारेपाटण ग्रा.पं. सदस्य श्री गुरूप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे,सौ अस्ताली पवार, देवानंद ईसवलकर खारेपाटण प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रिया वडाम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने शिवसेना पक्षाचा वर्धापन दीन यावेळी मोठ्या उस्ताहात साजरा करण्यात येणार असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेना पक्षाच्या वर्धापन दीन सोहळा कार्यक्रमाला जाणार असल्याचे शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख श्री मंगेश गुरव यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!