ईसीजी टीएमटी, रँडम शुगर आदी तपासण्या होणार मोफत
कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून माधवबागच्या माध्यमातून २० व २१ जून या काळात सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली येथील संस्थेच्या कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, ब्लॉकेजेस असणाऱ्या तसेच अँजिओग्राफी व बायपासचा सल्ला दिलेल्या तसेच, शस्त्रकीया झालेल्या रुग्णासाठी ईसीजी, टीएमटी, रैंडम शुगर आदी तपासणी अगदी मोफत करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक रुग्णांनी संस्थेच्या या कणकवली- ९३७३१८३८८८, कुडाळ- ९०११३२८५८१ सावंतवाडी- ७७७४०२८१८५ नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन माधवबाग परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे.











