दोडामार्ग (प्रतिनिधी): दोडामार्ग तळकट पंचक्रोशीत धुडगूस घालणाऱ्या हत्तीनी पुन्हा एकदा आपला मोर्चा तिलारी खोऱ्याकडे वळविला आहे. काल रविवारी रात्री या रानटी हत्तींनी पाळी गावात प्रवेश करून केळी, सुपारी बागायतीचे मोठे नुकसान केले. काही दिवसांपूर्वी हा रानटी हत्तींचा कळप तळकट पंचक्रोशीत होता तेथे त्यांनी बरेच नुकसान केले होते. त्यातील काही हत्तींनी पुन्हा एकदा आपला मोर्चा वितारी खोऱ्यात वळविला आहे. काल रविवारी रात्री या हत्तींचा कळप पाळये मध्ये फिरताना आढळला. गावात हत्ती आल्याची बातमी सर्व ग्रामस्थांनी एकमेकांना दिली. ग्रामस्थांनी आपल्या परीने या काला हुसकावून लावण्यास सुरूवात केली. मात्र त्याचा म्हणावा तसा काहीही उपयोग झाला नाही उलट या कळपाने मोर्ती बागवाडीमधील शेतकरी विनायक मणेरीकर यांच्या पाळये गावात असलेल्या बागायती प्रवेश करून धुडगूस घातला त्यांच्या बागायतीमधील ९० केळी व १०० सुपारीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
तिलारी खोऱ्यात हत्ती दाखल ; टस्कर ने केले नुकसान












