चौके (प्रतिनिधी) : ब्राह्मणदेव युवा मंडळ भटवाडी पेंडूर आणि विजय क्रीडा मंडळ भांडुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक ३१ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय खरारे पेंडूर येथे करण्यात आले आहे.तसेच यावेळी अल्प दरात चष्मा वाटप, आरोग्य तपासणी आणि परसबागेतील लागवडीकरिता बियाणे वाटप व मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले आहे, तरी पेंडूर गावातील सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेऊन शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन अध्यक्ष रवींद्र कासले यांनी केले आहे.
पेंडूर येथे उद्या मोफत नेत्र चिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिर












