धामापूर मार्गावर वाळूचे चार डंपर पकडले

तहसीलदार श्रीधर पाटील यांचा पुन्हा दणका ; रविवारी रात्री उशिरा कारवाई

चौके (प्रतिनिधी) : मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांनी रविवारी रात्री पुन्हा एकदा वाळू माफियांना जोरदार दणका दिला आहे. धामापूर मार्गावर वाळू भरुन वाहतूक करणारे चार डंपर पकडले आहेत. चारही डंपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.

मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील आणि त्यांच्या पथकाने सध्या बेकायदेशीर वाळू, खडी, चिरे यांच्यावर कारवाई करण्याचा धडाका सुरूच आहे. आंबेरी, तोंडवळी, देवली, नांदरुख नंतर आता धामापूरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. गोवा येथे वाळू घेऊन जाणारे डंपर पकडण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!