आंबेरी,धामापूर मार्गे बसफेरी पुन्हा सुरू आंबेरी,धामापूर येथे एस.टी.चे जंगी स्वागत.

माजी आ. शुभाष चव्हाण,धामापूर सरपंच मानसी परब,आंबेरी सरपंच मनोज डिचोलकर यांच्या पाठपुराव्यास यश

चौके (अमोल गोसावी) : गेली सुमारे १० ते १२ वर्षे बंद असलेली मालवण – आंबेरी – धामापूर मार्गे कुडाळ बसफेरी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. धामापूर चे सुपुत्र माजी आमदार सुभाष चव्हाण , धामापूर सरपंच सौ. मानसी परब , आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या मार्गावरील बस फेरी पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

दरम्यान मंगळवार दिनांक ११ रोजी सकाळी सर्वप्रथम आंबेरी येथे आल्यानंतर एस. टी. ला हार घालून सरपंच प्रवासी व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी चालक वाहकांना पुष्पगुच्छ देउन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच श्री. मनमोहन डिचोलकर, सदस्य श्री. कमलेश वाक्कर, सौ. मीनल सामंत ग्रामस्थ संदेश मांजरेकर ,प्रदीप मायनाक, सुधीर मायनाक, बाबा कुलकर्णी, महेंद्र सामंत, हितेश आंबेरकर, आनंद केळुसकर, पिंट्या परुळेकर, संजय कुलकर्णी, बाळा मायनाक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यानंतर धामापूर बौद्धवाडी बसथांबा येथेही शालेय विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून एस. टी. चे स्वागत केले. त्यानंतर सरपंच मानसी परब,उपसरपंच रमेश निवतकर यांनी एस टी. ला पुष्प हार घातला. सरपंच सौ. मानसी परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून येथे बसफेरीचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी चालक रवींद्र राणे आणि वाहक नितीन गावकर यांचा शाल , श्रीफळ , पुषगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी आंबेरी , धामापूर ग्रामस्थांच्या वतीने सदर बस फेरी सुरू होण्यासाठी सहकार्य करणारे एस. टी चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजीत पाटील , मालवण डेपोचे आगार व्यवस्थापक राहुल कुंभार , वाहतूक निरीक्षक स्वप्निल गडदे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सतिश वाळके यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गावडे , स्वप्नील नाईक , जयश्री थवी, तेजस्वीनी भोसले माजी सरपंच ज्ञानेश्वर परब ,माजी सदस्य अशोक थवी सचिन गावडे ,
सामाजिक कार्यकर्ते महेश परब , प्रा. महेश धामापूरकर, संदीप धामापूरकर , आनंद ( बाबू ) तोरसकर , बौद्धवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक गोसावी , कृष्णा धामापूरकर , विलास नाईक , सुजय कदम , संजय जाधव , सत्यवान नाईक , गोपाळ जाधव , जयेश नाईक ,मिलिंद नाईक , निळकंठ धामापूरकर , महादेव नाईक , चंद्रकांत नाईक , विलास धामापूरकर , श्रीकृष्ण शेट्ये , प्रकाश सावंत , गुरू परब , विश्वनाथ परब , रामचंद्र गावडे , वासु तारी , समीर नाईक आदी मान्यवर , ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

सदर बस फेरी सुरू झाल्यामुळे आंबेरी मळावाडी , भाटी वाडी , बौध्दवाडी , गावडेवाडी , येथून काळसे हायस्कूल मध्ये जाणाऱ्या २५ ते ३० विद्यार्थ्यांना एस. टी. ने प्रवास करण्यासाठी करावी लागणारी दिड ते दोन किलोमीटर ची पायपीट आता थांबणार आहे. तसेच वृद्ध नागरिक , रुग्ण व इतर प्रवाशांनाही फायदा होणार आहे. सध्या दिवसातून तीन फेऱ्या या मार्गावरून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही बसफेरी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या माजी आमदार सुभाष चव्हाण , धामापूर सरपंच सौ. मानसी परब , आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर , काळसे हायस्कूलचे मुख्याध्यापक पेडणेकर सर , उपसरपंच रमेश निवतकर , सदस्य प्रशांत गावडे , तसेच महेश परब , महेश धामापूरकर या सर्वांचे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!