सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई अंतर्गत कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग व गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २९ जानेवारी, २०२३ रोजी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे बौद्धाचार्य विशेष मार्गदर्शन, बौद्धाचार्य प्रमाणपत्र व सनद वितरण सोहळा पार पडला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळ जाधव (मानद ट्रस्टी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई केंद्रीय कार्यकारिणी) प्रमुख मार्गदर्शक जेष्ठ बौद्धाचार्य संतोष तांबे (संस्कार समिती बौद्धजन पंचायत समिती मंबई) तसेच सुरेश जाधव, उपाध्यक्ष सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई, मनोहर तांबे (बौद्धजन पंचायत समिती मंबई) प्रमुख उपस्थिती आय.बी.एस. कदम (सरचिटणीस सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई केंद्रीय कार्यकारिणी) उपस्थित होते. यावेळी वीस नूतन बौद्धाचार्य यांना संतोष तांबे यांनी बौद्ध धम्माबाबत मार्गदर्शन केले. बौद्ध धम्माच्या विधी केव्हा, कसे, करायचे याची माहिती सांगून या जगात बौद्ध धम्म कसा श्रेष्ठ आहे, त्याची तत्व प्रणाली काय, संस्कार कसे आत्मसात करावे, बौद्धाचारी म्हणून आपली कतर्व्य काय, आदरणीय मनोहर मोरे यांनी माणूस म्हणून कसे जगले पाहिजे, याची माहित करून दिली. यावेळी महासंघाचे सरचिटणीस बी. एस. कदम यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर यावेळी सूत्रसंचलन सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा सावंतवाडी तालुका सल्लागार व जेष्ठ बौद्धाचार्य नारायण आरोंदेकर यांनी केले. यावेळी कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग व गोवा विभागच्या नूतन बौद्धाचार्य यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बौद्धाचार्य प्रमाणपत्र व सनद वितरण करण्यात आले. शेवटी कुडाळ तालुक्याचे बौद्धाचार्य अमोल पावसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सावंत, सचिव टीळाजी जाधव, शिवाजी जाधव, अमित जाधव, सुमेध जाधव, कुडाळ तालुका अध्यक्ष पांडुरंग कदम, वेंगुर्ले तालुका उपाध्यक्ष गजानन जाधव, दोडामार्ग तालुका अध्यक्ष शंकर उसपकर तसेच महेश परुळेकर उपस्थित होते.












