वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांचा प्रवाशी संघाने केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांच्या लोकाभिमुख कार्याचा गौरव म्हणून कणकवली तालुका प्रवाशी संघाच्या वतीने हवालदार चव्हाण यांना जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रवाशी संघाचे तालुकाध्यक्ष मनोहर पालयेकर, सचिव सूर्यकांत चव्हाण, उपाध्यक्ष रमेश जोगळे आदी उपस्थित होते. हवालदार विनोद चव्हाण हे कणकवली शहरातील पटवर्धन चौकात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी अथक मेहनत घेत असतात. वाहनचालकांशी सलोख्याने वागत असतानाच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून वाहतूक सुरक्षितता बाळगण्याबाबत ते नेहमीच जनजागृती करत असतात.हवालदार चव्हाण यांच्या या कार्याची दखल घेत कणकवली तालुका प्रवाशी संघाने त्यांना सन्मानित केले.

error: Content is protected !!