तळेरे येथे शेतकऱ्यांसाठी ई – पीक पाहणी जनजागृती प्रशिक्षण आयोजित

तळेरे (प्रतिनिधी): तळेरे येथे शेतकऱ्यांसाठी ई – पीक पाहणी जनजागृती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी तळेरे गावातील शेतकऱ्यांसह तरुण पिढीने विशेष सहभाग घेतला. हा कार्यक्रम तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या डॉ.एम.डी. देसाई सांस्कृतिक भवनात संपन्न झाला. तळेरे सरपंच हनुमंत तळेकर आणि राजेश जाधव यांच्या विनंती वरून हा कार्यक्रम तळेरे येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कणकवली तहसीलदार आर.जे.पवार, नायब तहसीलदार श्री.राठोड, मंडळ अधिकारी श्री.नागावकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच शैलेश सुर्वे, माजी सभापती तथा तळेरे सोसायटी चेअरमन दिलीप तळेकर, तलाठी वीरेंद्र रासम, कृषी विभागाचे पर्यवेक्षक श्री.कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ.रिया चव्हाण, संदीप घाडी, माजी सरपंच दिनेश मुद्रस, सुरेश तळेकर, संतोष तळेकर, अंकित घाडी आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार आर.जे.पवार म्हणाले की, ई पीक पाहणीचे कामकाज पूर्ण करून सहकार्य करा. याबाबत सविस्तर माहिती घेऊन शेतकऱ्यांनी हे कामकाज पूर्ण करावे.असे सांगतानाच 100 टक्के पीकपाणी काम पूर्ण करायचे आवाहन करण्यात आले.

या प्रशिक्षणाचे विशेष म्हणजे यावेळी महाविद्यालयीन मुलांना प्रशिक्षण देण्यात आले. जेणेकरून मोबाईल वापरणारे तरुण प्रशिक्षित झाले तर ते शेतकऱ्यांना मदत करू शकतील. अशी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल राजेश जाधव यांचे तहसीलदार यांनी प्रशंसा केली.

यावेळी शेतीच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार राजेश जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!