दुर्घटना! २०० फूट खोल दरीत युवक कोसळला

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली येथे २०० फूट खोल दरीत एक युवक कोसळला आहे. मुख्य धबधब्याजवळ दोन युवक थांबले असताना त्यातील एकजण आंबोली घाटाच्या खोल दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करून शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली आहे.

error: Content is protected !!