सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण येथे नुकताच संपन्न झालेल्या कला व संस्कृती संचानालय गोवा सरकार आणि कला पर्यटन आणि संस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग, महाराष्ट्र यांच्या संयुक्त कला नाट्यउत्सवात वराड येथील गोंधळी लोककलाकर उल्हास विष्णू रणशुर यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
उल्हास विष्णू रनशुर हे हरहुन्नरी गोंधळी कलाकार असून त्यांनी वयाच्या ५व्या वर्षा पासून आपल्या वडिलांसोबत गोंधळ कला सादर करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी सिंधुदुर्ग गोवा या राज्यातून आपली पारंपारिक कला सादर करत आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या उल्हास रनशुर यांनी अथक मेहनत करुन अनेक पारितोषिके व मानपत्रे मिळविली. सध्या ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नोकरीस असून नोकरी व कला या दोन्ही गोष्टी जोपासत आहेत












