पावशीतील अ‍ॅप्रोच रोडचे काम अखेर मार्गी

श्रीपाद तवटे यांच्या मागणीला यश; पालकमंत्र्याचे मानले आभार

कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे अ‍ॅप्रोच रोडचे काम अखेर झाले आहे. त्यामुळे गावकरी व वाहनधारकांकडुन समाधान व्यक्त होत आहे.

याबाबत पावशीचे माजी सरपंच श्रीपाद तवटे यांनी लक्ष वेधले होते. त्या ठिकाणी चुकीच्या पध्दतीने अ‍ॅप्रोच रोड दिल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे हे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार श्री. चव्हाण यांनी सुचना दिल्यानंतर डांबरीकरण आणि खडीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!