काका पाठोपाठ पुतण्याचेही निधन ; वरवडेत बांदल कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे माजी सरपंच प्रभाकर बांदल यांचे निधन झाल्यानंतर आज सकाळी त्यांच्या मृतदेहावर वरवडे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र प्रभाकर यांच्या अंत्यविधीनंतर मुंबईहून वरवडेत आलेला त्यांचा पुतण्या महेश नारायण बांदल ( वय 38, रा.हिवाळेवाडी, वरवडे ) याचेही हार्ट अटॅक ने दुःखद निधन झाले. काका पाठोपाठ पुतण्याचेही अवघ्या 24 तासांत निधन झाल्यामुळे बांदल कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. काका प्रभाकर बांदल यांच्या अंत्यसंस्कारासाठी महेश मुंबईतून वरवडेत गावी आला होता. प्रभाकर बांदल यांच्यावर स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करून घरी आल्यानंतर महेश याना हार्ट अटॅक आला. आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.महेश यांच्या पश्चत आई वडील, पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे.

error: Content is protected !!