मसुरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडीतील श्री भराडी देवी जत्रोत्सवाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी “श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास” (रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट, मालवण या संस्थेच्या वतीने “श्री स्वामी समर्थ मठामध्ये येणाऱ्या भाविक भक्तासाठी ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७ ते ११ वा. पर्यंत नाष्टा, दुपारी १२:३० ते ३ वा.पर्यंत जेवण,सांयकाळी ४ वा. अल्पोपहार देण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी संपर्क (९४२३५३८४१८), ९४२०७३८४१८ ९८२१७१९१११ येथे संपर्क साधावा.













