सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : अंमली पदार्थ विरोधी मोहिम जिल्ह्यात अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागाने विविध माध्यमातून या मोहिमची जनजागृती करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी श्री.मठपती यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को कोऑडीनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची एकत्रित बैठक आज झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत,अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी एस.आर. पाटील हे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थितीत होते.तसेच विविध विभागाचे अधिकारी ऑनलाईन बैठकीत सहभागी होते.अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक उपाय-योजना अंमलबजावणीबाबत गृह विभाग व सर्व संबंधित विभागाव्दारे सुरु असलेल्या कामाची माहिती दिली.
अंमली पदार्थांची तस्करी, अवैध वाहतूक, अंमली पदार्थांची विक्री यावर निर्बंध आणण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यातील व्यसन मुक्ती केंद्र योग्य पध्दतीने सुरु असल्याबाबतची तपासणी करुन त्याठिकाणी जनजागृतीपर व्याख्याणांचे आयोजन करण्याचे सांगत जिल्ह्यात काही संशयित पार्सल आढळल्यास त्यावरही लक्ष ठेवण्याचे निर्देश श्री. मठपती यांनी दिले.