गोळवण ग्रामपंचायत मध्ये १०० शेतकऱ्यांना भरडधान्य बियाणे वाटप

फक्त एक रुपयात शेतकरी विम्याची देण्यात आली माहिती

विशेष ग्रामसभेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा काल मंगळवार,दिनांक 25 जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय गोळवण येथे सरपंच श्री. सुभाष लाड यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत भरड धान्य म्हणून नाचणी चे वाटप सुमारे 100 शेतकऱ्यांना करण्यात आले. ग्रामपंचायत मार्फत भाजी बियाणे किट चे वाटप करण्यात आले. आणि सदर सभेत स्वच्छ्ता विषयक चर्चा करण्यात आली. सदर सभेस गावाचे उपसरपंच श्री. गावडे सर, ग्रामपंचायत सदस्य श्री. शरद मांजरेकर, प्राजक्ता चिरमुले, ग्रामसेविका शेलटकर मॅडम, कृषी सहाय्यक श्री. सौंगडे , सर्व शाळांचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका तसेच गावातील 150 ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी फक्त 1 रुपयात मिळणाऱ्या शेतकरी विम्याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!