कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

कृषिमंत्री मुंडे,उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत झाली महत्वाची बैठक

शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे यांच्या मागणीला यश

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासन दिलासादायक निर्णय घेणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी आज विधिमंडळात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत राज्याचे सचिव तसेच कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी तळकोकणातील सिंधुदुर्गातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा कृषीमंत्र्यांसमोर मांडल्या. सिंधुदुर्गातील काजू बिल जीआय मानांकन प्राप्त आहे मात्र हमीभाव नसल्याने काजू बी अगदी 80 ते 90 रु प्रतिकिलो दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. गोवा राज्याप्रमाणे कोकणातील काजू बिला 180 ते 190 रु प्रतिकिलो हमीभाव मिळावा.बदलत्या हवामानाचा फटका हापूसचा राजा असलेल्या देवगड हापूस आंबा पिकाला बसतो. वादळ अवकाळी पाऊस यामुळे यावर्षी सरासरी 35 टक्के आंबा पीक आले. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यांना नुकसानभरपाई मिळावी. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीत तांत्रिक अडचणी आहेत.त्यामुळे 31 जुलै असणारी अंतिम तारीख वाढवून मिळावी याकडे संजय आग्रे यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे लक्ष वेधले.कृषिमंत्री मुंडे यांनी आग्रे यांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत शासन निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आग्रे यांनी दिली.

error: Content is protected !!