खळबळजनक ! बांद्यात एसटी स्टँडसमोर सापडला सडलेला मृतदेह

बांदा (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर बांदा बस स्थानक नजीक ढाब्यासमोर दुभाजकात सडलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर इसम सडलेल्या स्थितीत असल्याने चेहऱ्याचा भाग विद्रूप झाल्याने ओळख पटलेली नाही. मृतदेह विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. मयत होऊन चार – पाच दिवस उलटल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला. वेळी पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, विजय जाधव, बाळू गवस, श्रीमती माळकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!