अमित सावंत यांचे नगराध्यक्ष नलावडे ,उपनगराध्यक्ष हर्णे यांनी केले अभिष्टचिंतन

वाढदिवसानिमित्त अमित सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अमित गोपाळ उर्फ बाळा सावंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अमित सावंत यांचा वाढदिवस नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष नलावडे, उपनगराध्यक्ष हर्णे यांनी अमित सावंत यांचे विशेष अभिष्टचिंतन केले. यावेळी बांधकाम सभापती ऍड.विराज भोसले, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे,नगरसेवक शिशिर परुळेकर, माजी नगरसेवक अजय गांगण , महेश सावंत, चारू साटम आदी उपस्थित होते. कणकवली शहरातील अमित सावंत हे सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक असून नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे खंदे समर्थक आहेत.

error: Content is protected !!