सावंतवाडी (प्रतिनिधी): तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात झालेल्या भूकंपाचा धक्का 3.0 रिश्टेल स्केल,असा नोंदविण्यात आला आहे.या बाबतची नोंद कोयना धरण प्रकल्पावरून घेण्यात आली.अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.दरम्यान हा भूकंप सावंतवाडीच्या पूर्वेला ४ किलोमिटर आणि खोली ५ किलोमीटर, असा नोंदविण्यात आला.
सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही,असे त्यांचे म्हणणे आहे.आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आंबोली, सावंतवाडीसह आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते.हा भूकंप सौम्य होता.याबाबतची माहिती मिळवण्यासाठी श्री.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली आहे.दरम्यान सुदैवाने या भूकंपात मोठा स्फोटाचा आवाज झाला परंतु सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही,असे प्रशासनाचे म्हणणे.
सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचे हादरे ; ३.० रिष्टेल स्केल चा धक्का












