*नडगिवे नं.१शाळेत पावसाळी रानभाज्या प्रदर्शन संपन्न*
खारेपाटण(प्रतिनिधी):जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ येथे ‘पावसाळी रानभाज्या प्रदर्शन’ कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात संपन्न झाला.
पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या परिसरात पहायला मिळतात.खरं म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली ही अनमोल भेट आहे.पावसाळा सुरु झाला की,जमिनीत सुप्तावस्थेत असलेल्या वनस्पतीत एक नवी चेतना निर्माण होते.त्या पानोपानी बहरतात.
शरीराला अत्यंत आवश्यक असणा-या या भाज्या आपल्या आजुबाजूला परसात,शेतरानात,माळावर उगवतात.
या रानभाज्यांची ओळख शालेय विद्यार्थ्यांना व्हावी.त्यातील पोषक जीवनसत्वे,खनिजे,उपयुक्तता याचं ज्ञान आजच्या पिढीला व्हावे.हा या प्रदर्शनाचा हेतू आहे. प्रदर्शनात कर्टूली,फोडशी,कुर्डू,चिवारीचे कोंब,घोटवेल,हिरवा माठ,आघाडा,एकपानी,पेवगा,कुडा शेंग,टाकळा,शेवगा पाने,अळू,भारंगी,भोपळ्याची पाने,घोळ इत्यादी भाज्यांचे प्रदर्शन मांडले होते. कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थ्यांचा सहभाग छान लाभला.दुपार सत्रात पोषण आहारात मुलांनी रानभाजीचा आस्वाद घेतला प्रसंगी नडगिवे सरपंच श्रीम.माधवी मण्यार,मा.श्री.अमित मांजरेकर(माजी सरपंच) मा.श्री.अनिकेत जामसंडेकर,मा.श्री.भावेश कर्ले(माजी उपसरपंच)मा.सतीश कर्ले(व्य.स.अध्यक्ष )मा.श्री.अरुण कर्ले(माजी व्य.स.अध्यक्ष)मा.श्री.किरण कर्ले,मा.रविंद्र सुतार(व्य.स.शिक्षणतज्ञ)मा.श्रीम.अनिता पाटकर (मुख्याध्यापिका)मा.श्रीम.वर्षा आंबेरकर,श्रीम.अर्चिता गुंडये,श्रीम.साक्षी आंबेरकर,श्रीम.पाटील ,श्रीम.शितल कासले व पालक उपस्थित होते.
मान्यवरांकडून या उपक्रमाचे खूप कौतुकाचे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.संदीप कदम तर आभार श्रीम.अनिता पाटकर यांनी व्यक्त केले.












