ठाकर समाजाने आ. नितेश राणेंचे मानले आभार

जातपडताळणी प्रश्नी अधिवेशनात आयुक्त पावरांची केली होती पोलखोल

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : आमदार नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या जातपडताळणी मध्ये खोडा घालणाऱ्या आयुक्त पावरा यांची पोलखोल केली. ठाकर समाजाचा महत्वाचा प्रश्न अधिवेशनात लावून धरून ठाकर समाजाला न्याय मिळवून दिला. ठाणे कार्यालयातील आयुक्त पावरा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाची जातपडताळणी प्रकरणे फेटाळून लावतात. मात्र याबाबत कोर्टात दाद मागितल्यावर जातपडताळणी करून दिली जाते. यावरून आयुक्त पावरा हे सिंधुदुर्गातील ठाकर समाजबांधवांना आकसाने वेठीस धरत असल्याचे भर अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी उघड केले होते.आदिवासी विकास मंत्र्यांनीही पावरा यांची बदली करण्याचा शब्द आमदार नितेश राणेंना अधिवेशनात दिला आहे.या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग ठाकर समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत आभार मानण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष भगवान रणसिंग, सचिव दिलीप म्हस्के, कार्याध्यक्ष निलेश ठाकूर, मालवण तालुका अध्यक्ष रुपेश गरुड, कणकवली तालुका अध्यक्ष वैभव ठाकूर, जिल्हा सदस्य राजन रणसिंग, साई यादव, सुनील ठाकूर, समीर ठाकूर, सचिन ठाकूर, अच्युत मस्के, विठ्ठल सिंगनाथ, सुधीर गंगावणे, अमित ठाकूर, सचिदानंद ठाकूर, प्रशांत मराठे, सुहास ठाकूर, अविनाश ठाकूर, धनंजय ठाकूर,उमेश ठाकूर, अविराज मराठे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!