हिवाळे येथे गवारेडा विहीरीत पडला ; वन अधिकारी घटनास्थळी दाखल

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील हिवाळे गवळवाडी येथील श्री प्रदिप परब ( मसुरकर ) यांच्या विहीरीत गवारेडा पडल्याचे आज निदर्शनास आले. येथील रहिवासी श्री समीर पालव हे त्याठिकाणी गुरांसाठी चारा कापण्यासाठी गेले असता त्यांना विहीरीत गवारेडा पडल्याचे दिसून आले. त्यानंतर ही बातमी पोलीस पाटील विरेन कदम यांना ही बातमी कळवताच त्यांनी वन अधिकारी यांना सदर घटनेची माहिती दिली.

दरम्यान वनरक्षक शरद कांबळी आणि वनरक्षक अनिल परब हे घटनास्थळी दाखल झाली असून स्थानिकांच्या मदतीने गवा रेड्यास विहीरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सदर विहीर डोंगर भागात झाडे , वेली यांनी आच्छादलेली असल्याने गवारेडा त्या विहीरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!