उद्यानविद्या कार्यानुभव अंतर्गत गावात राहून घेणार शेतीविषयक माहिती
चौके ( अमोल गोसावी ) : उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत मालवण तालुक्यातील साळेल गावामध्ये कृषीकन्या यांचे आगमन झाले आहे. सदर विद्यार्थीनी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत गावामध्ये राहून शेतीविषयक माहिती घेणार आहेत. गावात राहून गावची शेतीविषयक कार्यपद्धती, विविध संस्था, शाळा, शेतीवर आधारित विविध उद्योग यांची सविस्तर माहिती घेणार आहेत. विविध शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण करणार आहेत. सदर गटामध्ये कु. स्नेहल कदम , सायली परब, सेजल जाधव, अथिना ओ. के., दिव्याक्षी सावंत, कोमल कावले या विद्यार्थिनींचा समावेश आहे.
यावेळी उद्यान विद्या महाविद्यालय मुर्दे मुळदे यांच्या कृषिकन्या यांचे साळेल ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच रवींद्र साळकर यांनी स्वागत केले. यावेळी ग्रामसेविका सौ. परब , सुचिता पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे , संतोष गावडे, संपदा गावडे, सुदर्शन पवार, गावातील शेतकरी रवींद्र परब, बाजी गावडे, विवेक गावडे, गणेश गावडे, विवेकानंद पेडणेकर आदी जण उपस्थित होते.













