मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल च्या जागेचा तिढा सुटला

सावंतवाडी संस्थान राजघराणे आणि महाराष्ट्र शासनात यशस्वी तडजोड

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटला जागा देण्याबाबत येथील राजघराणे आणि महाराष्ट्र शासन यांच्यात तडजोड अखेर झाली आहे. आता दोघांत करार करुन साडे तीन एकर पैकी ५० गुंठे जागा ही राजघराण्याला देण्यात येणार आहे. लवकरच हा करार करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे संस्थानकालीन असलेल्या मुख्य इमारतील कोणतीही बाधा न पोहोचविता त्या ठिकाणी हॉस्पिटलची नवी इमारत उभारली जाणार आहे. तर सद्यस्थितीत तहसीलदारांचा बंगला असलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्याची वसाहत उभारली जाणार आहे. तर तहसीलदार बंगल्यापासून हॉस्पिटलच्या पाठी मागच्या अशी राजघराण्याला जागा देण्यात आली आहे. तर आत्ताचा रस्ता अस्तित्वात असलेल्या ठिकाणावरूनच नव्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ची एन्ट्री असणार आहे. याबाबाबत सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी दुजोरा दिला आहे.

error: Content is protected !!