पिळदार शरीरयष्टीच्या अमजद शेखच्या अभिनयावर प्रेक्षक खुश
कणकवली (प्रतिनिधी) : ‘सन मराठी’ वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘वेतोबा’ या मालिकेत कलमठ येथील कलाकार अमजद शेख हे लिंबया नावाच्या दरोडेखोराची भूमिका साकारत आहेत. पिळदार शरीरयष्टी च्या अमजद शेख यांनी दरोडेखोर लिंबया ची भूमिका परफेक्ट वठवली असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांतून उमटत आहेत. ही भूमिका उत्तम प्रकारे वटवण्यासाठी मालिकेचे निर्माते सुनील सावंत-भोसले,नीलेश मयेकर, दिग्दर्शक नितीन काटकर प्रचंड मेहनत घेत असल्याचे शेख यानी सांगितले. यापूर्वी अमजद शेख यांनी देवाक काळजी, डांबरट,पिकोलो, डीनडॉग, प्रेम कथा धुमशान, कुसवा अशा अनेक मराठी फिल्ममध्ये अभिनय केला आहे. यूट्यूब चॅनेलवर अस्सल मालवणी क्रिएशनवर मालवणी भाषेतील अनेक शॉर्ट फिल्ममध्येही अभिनय केला आहे. नियमित व्यायाम शाळेत जावून कमावलेल्या पिळदार शरीरामुळे क्रूर लिंबया दरोडेखोर प्रेक्षकांचना प्रथमदर्शनीच भावतो. बहुशांतील सिनेमा व शॉर्ट फिल्ममध्ये अमजद शेख यांनी छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. अभियनाची कला जोपासून ते जायका बिर्याणी अँड चायनीज रेस्टॉरंट चा स्वतःचा व्यवसायही सांभाळत आहेत.