वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आज काळ बदलला आहे. हि संगणकिय व इंटरनेट शिक्षणाचे युग आहे. नोकऱ्यांसाठी त्या त्या शिक्षणाच्या संकल्पनेनुसार तसे शिक्षण हि काळाजी गरज बनली आहे. प्रशासकिय अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही. तसेच आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडीनुसार दुरदृष्टीने शिक्षण घेतल्यास उद्योग व्यवसायांतून सुध्दा आपण मोठे बनू शकतो. असे प्रतिपादन मुंबई येथील किर्ती महाविद्यालयाचे प्रा .अमेय महाजन यांनी केले.
मल्टी स्किल रिसर्च अँण्ड ट्रेनिग सेंटर सिधुदुर्ग या संस्थेतर्फे आज येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात घेतलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरती मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटनप्रसंगी सारस्वत बँकचे वरिष्ठ तज्ज्ञ संचालक सुनिल सौदागर, किर्ती महाविद्यालय, मुंबईचे समाजकार्य अभ्यासक्रमाचे प्रथितयश प्राध्यापक व समन्वयक अमेय महाजन, मार्गदर्शक डॉ. अमेय देसाई, बॅ.खर्डेकर महाविद्यलायाचे प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर, भाजपाचे कार्यालयीन सचिव शरद चव्हाण, शिबिराचे आयोजक प्रसन्ना देसाई, सारस्वत बँक वेंगुर्ला शाखाधिकारी सतिष वाळवे, मल्टी स्किल रिसर्च अँण्ड ट्रेनिग सेंटर सिधुदुर्गचे सचिव विजय रेडकर आदी उपस्थित हते.
दहावी, बारावी झाल्यानंतर विद्यार्थी इंजिनिअर किवा डॉक्टर होण्यासाठी त्या दिशेने जातो. परंतु, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी होताना दिसत नाही ही शोकांतिका आहे. याचे कारण म्हणजे प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी त्याग महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांना करिअर करण्याची संधी आहे. त्यासाठी स्पर्धा परिक्षांची कास धरा आणि त्यात यश मिळवा असे आवाहन प्राचार्य डॉ.बांदेकर यांनी केले. तर विजय रेडकर यांनी प्रास्ताविकात मल्टी स्किल रिसर्च अॅण्ड ट्रेनिग सेंटर सिधुदुर्ग या संस्थेचे कार्य विशद केले.या कार्यक्रमाला बॅ.खर्डेकर महाविद्यालय, रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेज व वेतोरे येथील गुलाबताई नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर अमेय महाजन यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व तलाठी भरतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.