सावंतवाडी (प्रतिनिधी) : कराड येथे सुशांत आप्पासो खिल्लारे (२६) रा. पंढरपूर, याचा खून केल्याप्रकरणी ताब्यात असलेल्या तुषार शिवाजी पवार (रा. कराड) याच्यावर येथील सावंतवाडी पोलीस ठाण्यात खूनासह, अपहरण करणे, पुरावा नष्ट करणे, तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभाय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दुसरीकडे घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सैरभकुमार अग्रव प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या उपस्थितीत आज आंबोली येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. तर शवविच्छेदन अहवालानंतर खिल्लारे याचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. मात्र व्हीसेरा राखून ठेवण्यात आला. आहे, अशी माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील आर्थिक व्यवहारातून खून करण्यात आलेल्या खिल्लारे याचे नातेवाईक आज दोन दिवसांनी सावंतवाडीत दाखल झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात सकाळी सात वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अपहरण करने, डांबून ठेवणे, पुरावा नष्ट करणे यासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मेगडे यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणात आता अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे,












