श्री देवी माऊली मंदिर कलशारोहण सोहळ्यात विशेष योगदान
चौके (प्रतिनिधी) : काळसे येथील श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार कलशारोहण आणि श्री गणेश व विठ्ठल रुक्मिणी मुर्ती मूर्तीस्थापना सोहळ्या निमीत्ताने आज कलश आणि मूर्ती यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यात सहभागी शेकडो भाविकांसाठी कै. विजया मोरेश्वर परब प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष प्रशांत परब,प्रियांका परब,सेक्रेटरी आरती अनंत राणे, प्रतिक परब, हरमीत परब,प्रतिक्षा परब, शोभा परब आणि कुटुंबीय यांनी मिरवणुकीदरम्यान लिंगेश्वर मंदिर नजिक होबळीचा माळ येथे मोफत शीतपेय वाटप केले. याचा मिरवणुकीतील सहभागी भाविकांनी लाभ घेतला आणि प्रशांत परब कुटुंबीयांना धन्यवाद दिले. याबरोबरच दुपारनंतर श्री देवी माऊली मंदिर येथे उपस्थित सर्व सुवासिनी महिलांना कै.विजया मोरेश्वर परब प्रतिष्ठानच्या प्रियांका प्रशांत परब,हरमीत प्रतिक परब आणि कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला. यासाठी लागणारे सर्व साहित्य , भेटवस्तू ( वाण ) कै विजया मोरेश्वर प्रतिष्ठान च्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले होते. याबरोबरच मंदिराच्या जीर्णोद्धारामध्येही प्रशांत परब कुटुंबीयांचे फार मोठे योगदान आहे.













