चिंदर गावचं नाव सर्वक्षेत्रात उज्वल करा – प्रभारी सरपंच दिपक सुर्वे

चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न…..!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने आज गावातील दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमातर्गंत गावातील जिल्हा परिषद शाळा मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धान मध्ये यशस्वी विद्यार्थी, तसेच विविध स्पर्धान मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य व प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज समागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन सुरुवात झाली.उद्योजक प्रकाश मेस्री, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर,प्रभारी सरपंच दिपक सुर्वे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना प्रभारी सरपंच दिपक सुर्वे म्हणाले आपल्या चिंदर गावचे मातृभूमी नाव शिकून उज्वल करा व यशस्वी व्हा.

यावेळी सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर,ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच राजश्री कोदे,दुर्वा पडवळ,स्वरा पालकर,महेंद्र मांजरेकर,सानिका चिंदरकर,रिया घागरे,जान्हवी घागरे,माजी पंचायत समिती सभापती हिमाली अमरे, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर,दिगंबर जाधव, धनजंय नाटेकर,स्वानंद सुर्वे,विश्राम माळगांवकर,रणजित दत्तदास,समिर अपराज,सिध्देश नाटेकर,मनवा चिंदरकर, केळसकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक भिमाशंकर शेतसंदी यांनी तर समारोप महेंद्र मांजरेकर यांनी केले.

error: Content is protected !!