सिंधुदुर्गातील वैभववाडीत उद्या पुन्हा एकदा उडणार बैलगाडा शर्यतींचा धुरळा

बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा वैभववाडी येथील नाधवडे येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या ही वर्षी बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन उद्या रविवार दि.५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता नाधवडे येथे एम आय डी सी च्या रिक्त जागेवर करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, कणकवली -देवगड – वैभववाडीचे आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३५,००० व चषक, द्वितीय पारितोषिक २५,००० व चषक, तृतीय पारितोषिक १५,००० व चषक, चतुर्थ पारितोषिक १०,००० व चषक, पाचवे पारितोषिक ५,००० व चषक तर उत्कृष्ट चालकास – २००० रुपयाचे पारितोषिक व उत्कृष्ट बैलजोडीस -२००० रुपयाचे पारितोषिक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. राज्यभरातील अनेक ठिकाणांहून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे.

error: Content is protected !!