मोरयेवाडी येथील लक्ष्मीकांत उर्फ नूतन सुधाकर मोजकर यांचे आकस्मिक निधन

नांदगाव( प्रतिनिधी ) : मोरयेवाडी येथील श्री. लक्ष्मीकांत उर्फ नूतन सुधाकर मोजकर, वय ३८ यांचे आकस्मिक निधन झाले. श्री लक्ष्मीकांत हे नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयात गेली पंधरा वर्षे लिपिक या पदावर काम करत असल्याने त्याचा चांगला जनसंपर्क होता. मनमिळाऊ व हसतमुख स्वभावाचे लक्ष्मीकांत नूतन या टोपण नावाने नांदगाव परिसरात परिचित होते. त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ, बहीण, काका,काकी,भावजय, भावोजी असा परिवार असून निवृत्त एस.टी.चालक श्री. सुधाकर मोरजकर यांचा तो मोठा मुलगा होता.

error: Content is protected !!