खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दीन आनंदी व उस्थाही वातावरणात साजरा करण्यात आला. खारेपाटण केंद्र शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ प्राप्ती कट्टी,माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर,सौ गौरी शिंदे,माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ प्रियंका गुरव, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री मंगेश ब्रम्हदंडे,समिती सदस्या सौ संध्या पोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त प्रारंभी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुुरवात करण्यात आली.तर शिक्षक दिनानिमित्त संपूर्ण एक दिवस शाळा शिक्षकांच्या भूमिकेत असलेल्या एकूण १५ विद्यार्थीशिक्षकांनी विद्यार्थी मुख्याध्यापक कु.राहत सारंग हिच्या नेतृत्वाखाली शाळा चालविली.तर शाळेच्या वतीने शालेय अध्यापनात सहभागी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. व कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
