कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल संदेश पारकर यांचा कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,सचिन सावंत, राजू राणे,भालचंद्र दळवी,महेश कोदे,रुपेश आमडोस्कर,दिव्या साळगावकर,माधवी दळवी,विलास गुडेकर,सचिन आचरेकर,संजय पारकर,रोहित राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
नूतन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा कणकवली शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांच्या हस्ते सत्कार












