देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० टक्के महीला कार्यकारणी असणारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा देवगड ही ग्रामसेवक संघटना ठरली आहे.या संघटनेच्या अध्यक्ष पदी मधुरा भुजबळ तर सचिवपदी सौ.श्रध्दा चेतन वळंजू यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 136 तालुका शाखा देवगड ने ऐतिहासिक निर्णय घेऊन संपूर्ण महिला कार्यकारिणी निवडली आहे. त्यामध्ये अध्यक्ष मधुरा भुजबळ, सचिव श्रद्धा वळंजू उपाध्यक्ष रेश्मा गोवळकर, सहसचिव रुमा फड, महिला उपाध्यक्ष भाग्यश्री सरोदे, कोषाध्यक्ष मनीषा पाटील, कायदेविषयक सल्लागार विद्या जाधव, संघटक प्रीती ठोंबरे, प्रचार प्रसिद्धी प्रमुख सुषमा खरवडे यांची बिन विरोध निवड करण्यात आली.यावेळी माजी अध्यक्ष उमर मुल्लांनी,सचिव विजय मलगुंड्डे, ग्रामसेवक सदस्य होते पांडुरंग शेटगे, उज्वल झरकर, राजेंद्र भुर्के, लक्ष्मण घरजाळे, विवेक नर,नागनाथ भिसे,गुणवंत पाटील आदी उपस्थित होते.













