खारेपाटण येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रथमच २१ दिवसांनी होणार गणपतीचे विसर्जन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील “खारेपाटणचा राजा ” म्हणून प्रसिद्ध असलेला खारेपाटण सार्वजनिक गणेश उस्तव मंडळाचा गणपती यंदा प्रथमच २१ दिवसानी विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक व बाळ गोपाळ मित्र मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष श्री भाऊ राणे यांनी दिली.

    खारेपाटण शिवाजीपेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या या सार्वजनिक गणपतीला बाळ गोपाळ मित्र मंडळ खारेपाटण यांच्यावतीने हा उस्तव सुरू केल्यानंतर यावर्षी मंडळाचा हा गणेश उस्तव २१ वर्षात पदार्पण करत असल्याने यंदा खारेपाटणचा हा सार्वजनिक गणपती २१ दिवसांनी विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. तर या सार्वजनिक गणेश उस्तावा निमित्त खारेपाटण मध्ये बल गोपाळ मित्र मंडळाच्या वतीने सलग २१ दिवस विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    दी.२९ सप्टेंबर २०२३ ते ६ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत रोज आरती व विविध मंडळांची भजने याबरोबरच दी.७ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता भव्य नारळ लढविणे स्पर्धा - या स्पर्धेतील  प्रथम क्रमांक विजेत्याला रोख रुपये ३००० /- व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांकाला रोख रुपये २०००/- व आकर्षक चषक मंडळाच्या वतीने सहभागी स्पर्धकांना  प्रत्येकी ५ नारळ स्पर्धेसाठी मोफत पुरविले जातील.तर या स्पर्धेकरीता २००/- रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.तसेच याच दिवशी रात्री ८.०० वाजता होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा - हा खास कार्यक्रम तथा स्पर्धा महीलांसाठी ठेवण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुप्रसिद्ध निवेदक व संगीताचे बादशाह समीर चराटकर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या महिलेला रुपये ५०००/- किमतीची पैठणी साडी तर द्वितीय क्रमांक उपविजेत्या महिलेला ३०००/- रुपये किमतीची पैठणी साडी तर तृतीय क्रमांक विजेत्या महिलेला १५०० /- किमतीची साडी भेट देण्यात येणार आहे. 

दी.८ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता श्री सत्य नारायण महापुजेचे आयोजन,दुपारी १.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन रात्री ८.०० वाजता महाआरती व रात्री ८.३० वाजता भव्य ढोल पथक स्पर्धा – या स्पर्धेतील प्रथम विजेत्या ढोल पथकाला रोख ७०००/- रुपये व आकर्षक चषक उपवीजेत्या संघाला ५०००/- रुपये व आकर्षक चषक तर तृतीय क्रमांक प्राप्त ढोल पथकाला रोख ३०००/- रुपये व आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. तर दी.९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणारा आहे.खारेपाटण येथे सार्वजनिक गणेश उस्तवा निमित्त बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धामध्ये ज्या स्पर्धकांना सहभाग घ्यावयाचा आहे. त्यांनी आपली नावे मंडळाचे कार्यकर्ते गणेश कारेकर – ८३२९०६९१७१,संतोष गाठे – ७५८८८६००,बबलू बाबरदेसाई – ८३२९८८१६८०,गणेश लवेकर – ८९८३१४९९२७ यांचेकडे नोंदवावीत असे आवाहन बालगोपाळ मित्रमंडळ खारेपाटण याच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!