कणकवली( प्रतिनिधी) : कनेडीगट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदीर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेत, सन 2023′ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. दि.०३/१०/२०२३ रोजी ते दि.०६/१०/२०२३ रोजी पर्यंत दररोज स.०८:०० ते ०९:३० या कालावधीत प्रशालेत हे शिबीर आयोजित करण्यात आले.
सदर शिबीर इयत्ता दहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्पोकन इंग्लिश, बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग, इंग्लिश ग्रामर अँड काम्पोझिशन, एज्युकेशनल डॉक्युमेंटरी, गणित मार्गदर्शन,सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थींना विविध शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
एकूणच हा एक अभिनव उपक्रम संस्थेच्या मार्फत घेण्यात आला, यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत तसेच सर्वांगीण विकासामध्ये मोलाची भर पडणार आहे. त्यांच्या बौद्धिक व शारिरीक कौशल्यात देखील मोठी वाढ होणार आहे.
या शिबीर मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक संजय सावंत, M.Com. (संस्थापक,श्रीदत्त क्लासेस भांडुप)सुंदर नरसिंहन,B.A. (निवृत्त सहसंपादक ,अमर उजाला वर्तमानपत्र,ब्लॅक बेल्ट मार्शल आर्ट्स) आर. विजयालक्ष्मी, B.A.Hon. (निवृत्त मुख्याध्यापिका) वर्षा कदम, B.E मार्गदर्शक म्हणून लाभले.
या शिबीराचे सांगता समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाध्यक्ष पद सतीश सावंत (अध्यक्ष, क.ग.शि.प्र.मंडळ,मुंबई ) यांनी भूषविले तसेच शालेय समिती चेअरमन आर.एच.सावंत,तुषार सावंत,प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी तसेच पर्यवेक्षक बयाजी बुराण,प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थिती होते.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार पी एन मसुरकर सर (सहा.शिक्षक माध्यमिक) यानी केले.