घराचे छप्पर कोसळलेल्या मांजरेकर यांना भाजप कडून आर्थिक मदत !

माजी खास. डॉ निलेश राणे यांच्या माध्यमातून मदतीचा हात ; भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत

मसुरे (प्रतिनिधी) : बांदीवडे  बाजारवाडी येथील  मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर गुरुवारी संध्याकाळी कोसळून मोठे नुकसान झाले होते. दरम्यान याबाबत माहिती मिळताच भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी रविवारी बांदिवडे येथे भेट देत पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली आहे. माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या माध्यमातून या कठीण प्रसंगात मांजरेकर यांना थोडासा दिलासा मिळावा यासाठी सदर मदत देण्यात आली असल्याचे यावेळी सामंत म्हणाले. तसेच यावेळी उपस्थित सरपंच आशु मयेकर यांच्या जवळ घरकुल योजनेमधून मांजरेकर याना लाभ मिळवून द्यावा अशी सामंत यांनी सूचना केली.

गोरगरीब ग्रामस्थांच्या मदतीसाठी दत्ता सामंत नेहमीच धावून जात असतात. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून दत्ता सामंत यांचा प्रत्यय आल्याची भावना यावेळी मांजरेकर यांनी व्यक्त केली. घराचे छप्पर कोसळून नुकसान झाल्या नंतर मंगल मांजरेकर याना मदत मिळावी यासाठी माजी उपसभापती छोटू ठाकूर तसेच भाजप पदाधिकारी यानी भाजप नेते दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते. यावेळी माजी उपसभापती छोटू ठाकूर, दीपक पाटकर, मालवण ता.खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, माजी जी. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, प्रफुल्ल प्रभू, सतीश बांदिवडेकर, आनंद परब, ललित चव्हाण, अशोक बागवे, सुनील घाडी जितेंद्र परब, तात्या हिंदळेकर, भाई मांजरेकर, राजू बिडये, सचिन हडकर, अजय पडवळ, आबा आईर, संतोष गावकर, बबन मुणगेकर, जुबेर सय्यद, आशिष चेंदवनकर, पुरुषोत्तम शिंगरे, शाहुलखन बांदिवडेकर तसेच भाजप पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!