फोंडाघाट मध्ये ढगफुटी भातपिकाचे नुकसान

नुकसानभरपाई साठी आवश्यक कार्यवाहीसाठी आमदार नितेश राणेंचे लक्ष वेधणार – अजित नाडकर्णी

फोंडाघाट (प्रतिनिधी): फोंडाघाट मध्ये आज ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. सायंकाळी 4 ते 6 वाजण्याच्या दरम्यान धोधो कोसळलेल्या परती च्या पावसाने फोंडाघाट सह परिसराला चांगलेच झोडपून काढले . या तुफानी पावसामुळे कापणीला आलेल्या भातपिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे. महसूल आणि कृषी विभागाने तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केली आहे. यासाठी आमदार नितेश राणेंची लक्ष वेधनार असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले.

error: Content is protected !!