आनंदयात्री वाड:मय मंडळ, वेंगुर्ले च्या अध्यक्षा व जेष्ठ कवीयत्री सौ.वृंदा कांबळी यांची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे कडे मागणी
प्रतिनिधी (आचरा): स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक वेंगुर्ला भेटीची आठवण म्हणून स्वामी विवेकानंद दालन, ई- लायब्ररी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा असे निर्देश पालकमंत्री मा. रवींद्र चव्हाण यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेला दिले आहेत. स्वामी विवेकानंद १८९२ सालच्या दरम्यान वेंगुर्ला येथे आले होते. वेंगुर्ला नगर वाचनालयात त्यांनी हिंदीतून भाषण केले होते. स्वामी विवेकानंदांची ही वेंगुर्ला भेट वेंगुर्ल्याच्या ऐतिहासात महत्वाची घटना आहे. स्वामी विवेकानंदांच्या वेंगुर्ला भेटीची आठवण वेंगुर्ल्यात असावी जेणे करून पुढील पिढीला या भेटीची माहिती होऊन प्रेरणा मिळेल. अशी मागणी आनंदयात्री वाड.मय मंडळ, वेंगुर्ला यांनी पालकमंत्री मा. रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. याचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, आनंदयात्री वाड.मय मंडळाच्या वृंदा कांबळी मॅडम करत होते. मा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मा. मुख्याधिकारी वेंगुर्ला नगरपरिषद यांना या संदर्भातील तात्काळ प्रस्ताव सादर करणाचे निर्देश दिले आहेत. त्याचे पत्र मा. मुख्याधिकारी यांना आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर आणि माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी दिले. या दालनामुळे युवा पिढीला स्वामी विवेकानंदांचे वीचार प्रेरणा देतील त्याच बरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि ई- लायब्ररीची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे. वेंगुर्लेत स्वामी विवेकानंदांचे दालनाला चालना मिळते ही बातमी समजल्यावर साहित्यिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.